गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श, प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष... हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी, आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी... गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..
भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या (गडू) बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते.
आज आपणही दीन, हीन बनलो असून वाईट प्रवृतींशी लढण्यासाठी म्हणून गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतीज्ञा करायची. भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळविण्याची प्रतिज्ञा करायची. आपल्या मनातील चंचल, स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत, स्थिर व सात्विक बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. हाच खरा विजय आणि तेव्हाच गुढी उभारणे हे खऱ्या अऱ्थाने होईल विजयपताका उभारण्यासारखे...
Source: MaharashtraTimes
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा